अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षापासुन सुरु आहे. रस्ता खोदुन ठेवल्याने व अपुर्ण कामामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत.
अनेकांना अपंगत्व, मणक्याचा आजार जडला आहे. याला जबबादार केंद्र सरकार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे.

तरी राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करावे. या मागणीसाठी पाथर्डी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांची येथील चौकात चरणपुजा केली.
गडकरी यांच्या प्रतिमेसमोर जोडे ठेवुन त्याची मंत्रउपचाराच्या जयघोषात पूजा करण्यात आली. महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करावे व प्रवाशांच्या जीवनाशी खेळण्याचे बंद करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आतापर्यंत दोन ठेकेदार बदलले आता काम का होत नाही. खासदारांनी सहा महीन्यात काम पुर्ण करण्याचे सांगितले होते पण होत नाही. पाणी नेमके कुठे मुरतय.
आमदार व खासदारांनी बैठका घेतल्या पण तो केवळ फार्स ठरला आहे. आता लोकप्रतिनिधीच्या प्रतिमेला हार घालुन त्यांचा सत्कार करण्याचा इशारा देखिल खे़डकर यांनी दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम