लॉजमध्ये प्रेमी युगुलांचे नग्नावस्थेत मृतदेह आढळून आले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरातील अथर्व लॉजमध्ये प्रेमी युगुलांचे नग्नावस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. लॉजमध्ये दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतांच्या कपड्यांची झडती घेतली.

सापडलेल्या वस्तूंमध्ये मृतकांची नावं, पत्ता व वय अशी कागदपत्रे सापडली. पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याबाबत अधिक माहिती अशी कि, ‘प्रकाश ठोसर असे (28 वर्ष) मृत तरुणाचं नाव आहे.

तर अश्विनी चव्हाण असं त्याच्या (35 वर्ष) प्रेयसीचं नाव आहे. प्रकाश व आश्विनी हे दोघेही बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास अथर्व लॉजमध्ये सोबतच आले होते.

‘त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी या लोकांशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळू शकले नाही.

त्यानंतर दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून कर्मचाऱ्यांनी आत पाहिले असता प्रकाश याचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत लॉजमधील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता,

तर त्याची मैत्रीण ही देखील अशाच अवस्थेत बेडवर आढळून आली. हे दिसल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe