अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- भारतीय हवामान खात्याने नुकताच पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार पुढचे ८ दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यानंतर देशात ईशान्य मान्सूनचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सोमवारी पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे, मुंबई, रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या अकरा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आजपासून २ डिसेंबरपर्यंत दक्षिण भारतात ईशान्स मान्सून सर्वात जास्त सक्रिय राहणार आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडू, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश या भागात पुढील आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ३ डिसेंबरनंतर देशात ईशान्य मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात ईशान्य मान्सून सामान्य होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम