‘ओमिक्रॉन’ कोरोना व्हायरसने टेंन्शन वाढवले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला हा निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- ‘ओमिक्रॉन’ या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात दहशत निर्माण केली आहे. हा विषाणू डेल्टा पेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या व्हायरसचा धोका लक्षात घेता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा.

केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

तसेच विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधीत यंत्रणांना दिले आहेत. दरम्यान, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली तर रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य व केंद्रशासित राज्यांना पत्र लिहून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe