अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- शासनात विलानीकरण करावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे अद्यापही बहुतांश ठिकाणी एसटी बसची चाके पूर्णतः बंदच आहे.
यातच नगर जिल्ह्यातही अनेक ठिकणी अशीच परिस्थिती आहे. दरम्यान एसटी कर्मचार्यांचा सुरू असणार्या संपात जिल्ह्यात आतापर्यंत टप्प्याटप्प्याने 150 कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
दरम्यान पगार वाढ जाहीर केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या कर्मचार्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिलेले आहेत.
मात्र, जिल्ह्यातील शेवगाव डेपो वगळता अन्य डेपो बंदच असल्याने आता राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. राज्य सरकारमध्ये विलनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यांहून अधिक काळापासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत.
मात्र, नगर जिल्ह्यातील शेवगाव डेपोतील कर्मचार्यांनी शुक्रवार (दि.26) पासून संपातून माघार घेत कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे संप मागे घेण्याचे आदेश असतांना काम बंद करणार्या 150 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. तर 25 जणांची सेवा सामाप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एसटीचे कार्यालयीन कर्मचारी आणि वर्कशॉपमधील कर्मचारी कामावर हळूहळू हजर होत असल्याची माहिती नगरच्या एसटी विभागाकडून देण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम