अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.
राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग 1 डिसेंबपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.
याआधी राज्य सरकारने राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार असे जाहीर केले होते. मात्र ओमिक्रॉन विषाणूमुळे शाळा उशिराने सुरु केल्या जाणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या विषाणूविरोधात लढण्यासाठी जगभरात वेगवेगळे निर्बंध घातले जात आहेत.
राज्य सरकारनेदेखील आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या.
त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा 1 डिसेंबर रोजीच सुरु होणार आहेत.
काय आहेत नियम ? जाणून घ्या
सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर ठेवावे एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी बसावेत सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर करावा कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.
विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करावी कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.
शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम