अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्षद्वीप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी संपूर्ण कोकण,
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली.
मुंबईसह कोकण विभागात सर्वत्र, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
जाणून घ्या पावसाचा अंदाज २ डिसेंबर : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर ३ डिसेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह.
अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा.
विदर्भातही तुरळक ठिकाणी बरसणार बळीराजा चिंतेत हा अवकाळी पाऊस ज्वारी व गहू या पिकांसाठी उपयुक्त आहे.
काजू, द्राक्षे व आंब्याला बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी पिकांवर बुरशीनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी खात्याने शेतकऱ्यांना केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम