राज्यातील या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे.

सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातीलगाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ही गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली.

या अपघातात उदय सामंत यांना मुका मार लागला असून ते सुरक्षित आहेत.

मंत्री सामंत मुंबईमधील एका कार्यक्रमासाठी जात होते.

ते गाडीमध्ये एकटेच होते. त्यांच्या मागे त्यांच्या विशेष सुरक्षा पथकाचा ताफा होता.

मंत्री सामंत यांच्या मागच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे ती गाडी सामंत यांच्या गाडीवर आदळली.

या अपघातात मंत्री सामंत यांना किरकोळ मुका मार लागला.

त्यांचे सुरक्षा अधिकारी जखमी झाले असून, त्यांच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा सर्व खर्च आपणच करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe