अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण विभागावर मोठा परिणाम झाला होता. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर काही दिवसांपूर्वी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यातच आता बाहेरील देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट उदयास आला आहे.
याचे काही रुग्ण देशातदेखील सापडल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होणार का ? असा सवाल उपस्थित होत असताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याप्रश्नी महत्वाचं विधान केले आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “आम्ही जेव्हा नियमावली बनवली तेव्हा प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करून नियम बनवले. आम्ही टास्क फोर्ससोबत सातत्याने बोलत आहोत.
ही नियमावली टास्क फोर्सला देखील पाठवली. त्यावर चर्चा झाली आणि मग ही नियमावली (एसओपी) निश्चित झाली. याशिवाय काही निर्णय घ्यायचा झाला तर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
परीक्षा असो की इतर गोष्टी आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. त्यानुसारच भविष्यात निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.
ज्या ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी शाळा बंद करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले. शाळा सुरू करायची की नाही याचाही निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
त्यामुळे मुंबई, पुणे या शहरांच्या शाळेत १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत विचार होत आहे. हे सर्व लक्षात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम