मोठी बातमी ! राज्यात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण सापडला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्रात सध्या असणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरियंटबाबतची चिंता व्यक्त होत असताना आता आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअएंटचा शिरकाव झाला आहे.

आज धारावीत ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. पूर्व आफ्रिकेतून परतलेल्या एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं धारावीकरांची चिंता वाढली आहे.

मुंबईमधील धारावीमध्ये एक व्यक्ती ओमायक्रॉन व्हेरियंटने संक्रमित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती देताना बीएमसीने म्हटलंय की, टांझानियामधून हा व्यक्ती परतला होता.

सध्या या रुग्णाला सेवनहिल्स हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी झाली असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा २५ वर गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. देशात आढळलेल्या बहुतांश ओमायक्रॉन बाधितांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणं आहेत. राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ११ वर पोहोचली आहे. राजस्थानात ९ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News