‘सनफार्मा’ च्या आगीत एवढ्या कोटींचे नुकसान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली होती. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

आता कंपनीचे अधिकारी श्रीनिवास यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात जळीताची नोंद केली आहे.

कंपनीमधील सॉलवंटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे दीड कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

त्यावरून पोलिसांनी अकस्मात जळीतची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी कामगार राज्यमंत्री बच्चु कडू यांनी भेट दिली होती.

त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या सुचना एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News