अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- नगर जिल्ह्यामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.यामध्ये लायसन शिवाय वाहन चालविल्यास पूर्वी पाचशे रुपये दंड होता तर आता पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे.(License penalty)
तसेच ट्रिपल सीट ला पूर्वी दोनशे रुपये तर आता एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.विनासीट बेल्टला पूर्वी 200 तर आता 500,

कर्णकर्कश हॉर्न वाजवल्यास पूर्वी 200 तर आता एक हजार व फोर व्हीलरच्या काचेला ब्लॅक फिल्म लावल्यास पूर्वी 200 तर नवीन नियमावलीत 500 असे इतरही उल्लंघनाच्या प्रकारामध्ये नवीन कायद्यानुसार बदल करण्यात आला आहे.
त्याची अंमलबजावणी चालू झाल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.भोसले यांनी प्रेस नोट द्वारे दिली आहे. तरी नागरिकांनी आता मोटर वाहन चालविताना कायद्याचे व नियमांचे पालन करावे जेणेकरून आपल्याला हा भुर्दंड बसणार नाही .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम