अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहर वाहतूक शाखेने शहरा मध्ये फॅन्सी नंबर प्लेट तसेच सायलेन्सर बदलून विचित्र आवाज काढणारे वाहने , विना लायसन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांवर कारवाई केली आहे.
वाहतूक शाखेच्या या कारवाईत पथकाने 24 तासात सुमारे २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे बेशिस्त तसेच नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान शहरात गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम थंड होती. मात्र आता पुन्हा शहर वाहतूक शाखेने मोहीम सुरू केली असून विविध फॅन्सी नंबर प्लेट जप्त करत त्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
तसेच सध्या नगर शहरात बुलेट या वाहनाचे सायलेन्सर बदलून विचित्र आवाज काढत फिरण्याचे मोठी फॅशन झाली आहे. अशा सायलेन्सर बदललेल्या गाड्यांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वाहनचालकांना आवाहन नागरिकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळवेत हेल्मेटचा वापर करावा विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट वाहने चालवू नये असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम