वाहनाच्या धडकेत हरीण गंभीर जखमी ; या ठिकाणी घडली घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- पहाटे रस्ता ओलंडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने एका हरिणाला धडक दिल्याने ते जखमी झाले आहे. परळी ते मुंबई कडे जाणारा सिमेंटचा रस्ता झाल्याने सर्वच वाहने जास्तीत जास्त वेगाने धावत असतात.

अजुन काही ठिकाणी कामे बाकी आहेत. तरी सुध्दा छोटी मोठी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. याचा फटका एका वन्यजीवास बसला. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदे तालुक्यात हा अपघात झाला होता.

दरम्यान दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोघांनी या जखमी हरणास पाहिले असता ते मदतीसाठी धावले. एका उपस्थितीने याबाबतची कल्पना वन विभागाच्या वनरक्षक घोडके

यांना फोनवरुन दिली. त्यांनी इतर कर्मचार्यांना माहिती दिली. तोपर्यंत रेसक्यु टिमचे कमसेश गुंजाळ घटनास्थळी पोहोचुन वन्यजीवास मदत दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe