सदाअण्णांचे नाव पुढे करून दिशाभूलकरण्याचा डाव

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  स्व. सदाशिव पाचपुते यांचे नाव पुढे करून नागवडे कारखान्यात सभासदांची दिशाभूल करण्याचा डाव विरोधकांमार्फत आखला जात आहे.(babanrao pachpute)

हा डाव सुज्ञ सभासद निवडणुकीत हाणून पाडतील. सदा अण्णा आज असते तर विरोधकांची पळताभुई थोडी झाली असती. हे सर्व तालुक्याला ज्ञात आहे. आमदार बबनराव पाचपुते गट हा एकसंघ आहे आणि तो यापुढे ही कायम राहील यात शंका नाही, असे मत माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व काष्टीचे उपसरपंच सुनील पाचपुते यांनी व्यक्त केले.

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. यात सदाण्णांना मानणारा वर्ग नागवडे यांना मदत करणार असल्याचे चर्चा पेरली गेली, यात कसले ही तथ्य नसल्याचे सांगत नाहाटा व पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रक काढले.

यामध्ये म्हटले आहे की, “ विधानसभा निवडणुकीत काहीच ठरले नसताना हयात नसलेल्या व्यक्तींच्या नावाने साक्ष काढणे हे नैतिकतेला धरून नाही. विधानसभा निवडणुकीत नागवडे हे सत्तेच्या मोहाने भाजप मध्ये आले होते. सत्ता बदल झाल्यानंतर पुन्हा काँग्रेस मध्ये गेले. विधानसभेला नागवडे यांना पाचपुते यांनी भाजप मध्ये स्वीकारले हा मनाचा मोठेपणा होता.

सदा अण्णा या सगळ्या प्रक्रियेचे एक भाग होते. राजकीय स्वार्थासाठी कोणीही वावड्या उठवू नयेत. स्व. पाचपुते यांनी बबनराव पाचपुते यांचे नेतृत्व मानून समाजकारण व राजकारण केले. बबनराव पाचपुते यांनी घेतलेल्या भूमिकेशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही.

बबनराव पाचपुते यांच्या प्रति असलेले अण्णांचे प्रेम कधीही लपून राहिलेले नाही. बबनराव पाचपुते यांना दैवत मानत स्वामिनिष्ठा काय होती, हे उभ्या तालुक्याला माहिती आहे, त्यामुळे पाचपुते गटात कोणीही कुंभा कालवून राजकीय स्वार्थ साधण्याचे पाप करू नये, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब नाहाटा व सुनील पाचपुते यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe