तुमचे पॅन कार्ड बनावट तर नाहीना ? अशा पद्धतीने ओळखा खरे- खोटे

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- भारतासह संपूर्ण जगात गेल्या काही वर्षांत डिजिटायझेशनचा वेग खूप वेगाने वाढला आहे.

अशा परिस्थितीत देशात त्याच्याशी संबंधित फसवणुकीचे प्रमाणही अनेक पटींनी वाढले आहे. बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.

आजकाल बनावट पॅनकार्डच्या वाढत्या घटनांमुळे आयकर विभागाने अनेक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बनावट पॅनकार्ड ओळखण्यासाठी आयकर विभागाने पॅनकार्डसोबत क्यूआर कोड जोडण्यास सुरुवात केली आहे.

तुमचे पॅन कार्ड खरे आहे की बनावट हे आता तुम्ही देखील सहजरित्या शोधू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला आज काही सोप्या टिप्स सांगणारा आहोत… प्रथम तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. त्यानंतर तुम्ही Verify your PAN वर क्लिक करा.

यानंतर येथे तुम्हाला पॅनचा संपूर्ण तपशील विचारला जाईल, जो तुम्ही भरला पाहिजे. येथे तुम्ही पॅनकार्ड क्रमांक, नाव, DOB (जन्मतारीख) आणि मोबाईल क्रमांक टाका.

यानंतर तुमचा डेटा मेल अकाऊंट आहे की नाही असा मेसेज येईल. यानंतर तुमचे पॅनकार्ड खरे आहे की बनावट हे सहज कळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe