Ahmedabad Plane Crash मध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे दु:खद निधन

अहमदाबादहून एक गंभीर आणि दु:खद घटना समोर आली आहे. गुजसेल विमानतळावर एअर इंडियाचे एक विमान कोसळल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे. या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृह राज्यमंत्री हर्ष संघवी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे दु:खद निधन झाले आहे, विमानतळावर मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, … Read more

अहमदाबादमध्ये Air India विमानाचा भीषण अपघात; लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले

Air India Plane Crash : अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेलं एअर इंडियाचं एक विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या मेघानीनगर परिसरात हा अपघात घडला. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. उड्डाणानंतर विमान कोसळल्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर काळा धुर … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! IRCTC बंद करतेय लाखो अकाऊंट्स , तुमचंही असू शकतं नाव; लगेच करा ‘हे’ काम

भारतीय रेल्वेने आता टिकट बुकिंगसाठी एक नवीन आणि अत्याधुनिक पाऊल उचलले आहे. अनेक फेक आणि बोगस खात्यांवर आवर घालण्यासाठी रेल्वेने AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित प्रणाली विकसित केली आहे. या यंत्रणेमुळे आधार पडताळणी न केलेली लाखो खाती बंद होऊ लागली आहेत. IRCTC च्या या मोठ्या कारवाईत तुमचे खातेही बंद होणार का, हे वेळेत जाणून घेणे … Read more

10 हजार चीनी सैनिकांशी लढणारा भारतीय योद्धा, ज्याच्या नावाने तिबेट थरथर कापत होतं! वाचा जनरल जोरावर सिंग यांची पराक्रमी गाथा

अनेकदा इतिहासात असे धगधगते क्षण असतात, जे आपल्याला एखाद्या महान योद्ध्याच्या पराक्रमाची आठवण करून देतात. भारताच्या शौर्यगाथेतही अशाच एका विस्मरणात गेलेल्या पण अत्यंत पराक्रमी योद्ध्याची कहाणी दडली आहे – जनरल जोरावर सिंग. त्यांचं नाव आज फारसं ऐकू येत नाही, पण एकेकाळी त्यांच्या धाडसामुळे तिबेट आणि चीनसारखी साम्राज्यं थरथर कापत होती. युद्धभूमीवर त्यांच्या आगमनाची चाहूल लागताच … Read more

ताजमहालमधील ‘ते’ 22 दरवाजे अजूनही बंदच! काय दडलंय या खोल्यांत? सत्य समोर आलं तर इतिहास बदलेल?

प्रेमाचं एक अमर स्मारक ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून लाखो लोक दरवर्षी भारतात येतात. पण या शुभ्र संगमरवरी महालाच्या आत काही अशा गोष्टी लपलेल्या आहेत, ज्या केवळ त्याच्या सौंदर्यामुळे नव्हे, तर रहस्यांमुळेही लोकांना अचंबित करतात. त्याच्या भव्यतेच्या मागे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. त्यापैकी एक सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे ताजमहालच्या तळघरात असलेल्या 22 बंद खोल्या – ज्या आजही … Read more

भारतातील ह्या मंदिरात दडलेय जगाचा अंत आणि स्वर्ग नरकाचे उत्तर ! कसे जाल ह्या ठिकाणी वाचा संपूर्ण माहिती…

जगाचा अंत कधी होईल, हा प्रश्न मानवजातीच्या मनात हजारो वर्षांपासून गुंफलेला आहे. अनेक धर्म, तत्त्वज्ञान, आणि विज्ञान या प्रश्नाला वेगवेगळ्या उत्तरांनी वेढलं आहे, पण नेमकं उत्तर कुणालाही माहीत नाही. असं म्हणतात की उत्तराखंडच्या डोंगराळ भागात एक अगदी वेगळंच आणि अद्भुत मंदिर आहे पाताळ भुवनेश्वर, जिथे या प्रश्नाचं रहस्य दडलेलं आहे. पाताळ भुवनेश्वर मंदिर गंगोलीहाटपासून जवळजवळ … Read more

भारतात किती महिला मोबाईल वापरतात ? समोर आली धक्कादायक माहिती

mobile usage among women

India Facts : आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन केवळ संवादाचे साधन राहिलेले नाहीत, तर ते जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, बँकिंग, आणि अगदी वैयक्तिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांत मोबाईलचा वापर झपाट्याने वाढत आहे. केवळ माहिती मिळवण्यापुरतेच नव्हे, तर जगाशी जोडलेले राहण्यासाठी मोबाईल हा आधुनिक युगाचा मूलभूत आधार बनला आहे.  विशेषतः महिलांसाठी मोबाईल … Read more

भारतातील हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेली ‘ही’ जुनी शहरे तुम्हाला माहितीयेत का?, एकाचा चाणक्यांनीही केलाय उल्लेख!

Ancient Indian Cities: भारताचा ऐतिहासिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. इथे अशी अनेक शहरे आहेत जी हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत आणि ज्यांचं महत्त्व आजही कायम आहे. या शहरांचा उल्लेख केवळ भारतीय ग्रंथांमध्ये नाही, तर प्राचीन परदेशी प्रवाशांच्या आणि मुत्सद्दींच्या नोंदींमध्येही आढळतो. अशाच 5 ऐतिहासिक शहरांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत, ज्यांचा संबंध मौर्य, गुप्त, विजयनगर आणि … Read more

गोदावरी नदी किती खोल आहे? वाचा, भारतातील सर्वात खोल 10 नद्यांची यादी

सांस्कृतिक वारसा, अद्वितीय परंपरा आणि गौरवशाली इतिहास लाभलेली भारत भूमी आहे. ही तपश्चर्या आणि नामजपाची भूमी आहे. येथे विविधता आणि सुसंवाद एकत्र पाहता येतो. येथून वाहणाऱ्या पवित्र नद्यांचेही विशेष महत्त्व आहे. या नद्यांच्या काठावर अनेक प्राचीन संस्कृती विकसित झाल्या असल्याचा इतिहास आहे. भारतातील नद्या या केवळ पिण्याच्या पाण्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या … Read more

1 जूनला उघडणार भारतातील ‘फुलांचा स्वर्ग’; काय आहे या स्वर्गात ज्याने युनोस्कोलाही चकीत केलंय? वाचा

आकर्षक फुले शरीरालाच नाही तर मनालाही शांती देतात. अशा विविध रंगी व विविध सुगंधी फुलांचा स्वर्ग आहे, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’. या व्हॅलीत तुमची नजर जाईल तेथपर्यंत फक्त रंगीबेरंगी फुले दिसतात. विशेष म्हणजे ही व्हॅली वर्षातील फक्त तीन ते चार महिनेच पर्यटकांसाठी खुली असते. तीच व्हॅली यंदा 1 जूनला पर्यटकांना पाहता येणार आहे. यूनेस्कोलाही पडली भुरळ … Read more

नेमके कोण होते नीम करोली बाबा? त्यांच्या नावाची कथाही आहे अजब

उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील कैची धाम मंदिर आहे. नीम करोली बाबांच्या भक्तांसाठी हा स्वर्ग समजला जातो. जून 2024 मध्ये कैंची धामच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाले. भारतातच नाही तर जगभरात नीम करोरी बाबांचे भक्त आहेत. नीम करोली बाबा कोण होते, त्यांनी अध्यात्माचा मार्ग कसा निवडला, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जमीनदार कुटुंबात झाला जन्म नीम करोली … Read more

भारतातील ‘या’ 5 रहस्यमयी गुहा; ज्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पहायला हव्यात

भारतात अशा अनेक गुहा आहेत, ज्या त्यांच्या रहस्यमय इतिहासासाठी आणि अद्भुत कलेसाठी ओळखल्या जातात. या लेण्या केवळ प्राचीन काळाच्या कथा सांगत नाहीत तर भारतीय संस्कृती आणि कलेचे एक अद्वितीय उदाहरण देखील सादर करतात. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर या लेण्यांना भेट देणे तुमच्यासाठी एक संस्मरणीय अनुभव असू शकते. आज आपण अशाच पाच रहस्यमय गुहांबद्दल जाणून … Read more

जगातील कोणताही देश फक्त 30 मिनिटांत बेचिराख; चीनने विकसीत केले अंतराळ युद्धाचे तंत्रज्ञान

भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनने केलेल्या एका दाव्यानंतर संपूर्ण जग हादरून गेले आहे. चीनने आता अवकाशातून क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता विकसीत केल्याचा दावा केला आहे. त्यांचा हा दावा खरा असेल तर, चीन जगातील कोणत्याही देशावर फक्त 30 मिनिटांत हल्ला करु शकतो. चीनच्या या दाव्यानंतर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. कारण आत्तापर्यंत जमीनीवरुन युद्ध करण्याचे नियम होते. … Read more

इतिहासातला ‘असा’ योद्धा जो देश हरल्यानंतरही 29 वर्षे दुश्मनाशी एकटा लढला; वाचा अंगावर रोमांच आणणारी कथा

गेल्या काही दिवसांपासून भारत- पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने अगाध पराक्रम दाखवला. अशाच पराक्रमाच्या गोष्टी सुरु असताना जपानच्या एका सैनिकाचा उल्लेख करावासा वाटतो. या सैनिकाने आपल्या देशाचा पराभव झाल्यानंतरही तब्बल 29 वर्षे देशाच्या दुश्मनांशी एकट्याने युद्ध केले. कोण होता हा सैनिक? दुसरे महायुद्ध सुरु होते. 26 … Read more

भारतात असे एक राज्य आहे जे जर्मनीएवढे आहे; थाटही असा की थेट जर्मनीचे पर्यटक येतात

जर्मनी देश हा जगातील विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. जर्मनीने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. क्षेत्रफळाचा विचार केला तर जर्मनीचे क्षेत्रफळ 3,57,022 चौरस किलोमिटर आहे. भारतातले एक राज्यही तेवढेच आहे, हे तुम्हाला माहित आहे का? विशेष म्हणजे भारतातील या राज्याची जगभरातील लोकांना भुरळ पडलीय. जर्मनीचे नागरीकही तेथे पर्यटनासाठी येतात. राजस्थानची रितच न्यारी भारतातील सर्वात मोठे … Read more

Indian Post : पोस्टातर्फे देशभरात पाठवता येणार पुस्तकं, भारतीय डाक विभागाने सुरू केली नवी योजना!*

भारतीय डाक विभागाने १ मे २०२५ पासून ‘ज्ञान पोस्ट’ ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे, ज्यामुळे पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि सांस्कृतिक-धार्मिक दस्तऐवज कमी खर्चात देशभर पाठवणे शक्य होणार आहे. ही योजना विद्यार्थी, लेखक, प्रकाशक आणि अभ्यासकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. ऑनलाइन ट्रॅकिंग, स्वाक्षरीनिशी वितरण आणि पोस्टिंगचा पुरावा यांसारख्या सुविधांसह ही सेवा माफक दरात उपलब्ध आहे. … Read more

काय सांगता? मुंबईत आहे भारताच्या ‘शत्रू’चा बंगला; 2.5 एकर जागा आणि बंगला आहे 2600 कोटींचा

मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा आणि उच्चभ्रू परिसर मानला जातो. या परिसरात जमीन आणि मालमत्तेची किंमत आता सोन्यापेक्षाही जास्त आहे. देशातील मोठ मोठे उद्योजक आणि व्यवसायिक येथेच राहतात. गोदरेज, रुईया, जिंदाल यांसारखे श्रीमंत कुटुंब येथे राहतात. एवढ्या महागड्या परिसरात एक असा बंगला आहे जिथे बसून देशाचे दोन तुकडे करण्याचा कट रचला गेला. होय, भारताच्या … Read more

भारतातील सर्वात उंच इमारत कोणती माहिती आहे का? प्लॅटची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वांत उंच इमारत आहे. परंतु भारतातील सर्वांत उंच इमारत कोणती? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आपण भारतील सर्वांत उंच इमारतीबद्दल माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे भारतातील सर्वात उंच इमारत आपल्या महाराष्ट्रात आहे. मुंबईत आहे सर्वात उंच इमारत भारतातील सर्वांत उंच इमारत ही आपल्या मुंबईत आहे. वरळी येथील पॅलेस रॉयल … Read more