अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- राज्यात वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तात्काळ लॉकडाऊन लागू करणार नसून संसर्ग रोखण्यासाठी अतिरिक्त निर्बंध कडक करणायचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार आज रात्रीपर्यंत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची शक्यता आहे. राज्यात मंगळवारी 18,466 नवीन पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या 67,30,494 वर पोहोचली आहे आणि मृतांची संख्या 1,41,573 वर पोहोचली आहे.
राज्यात नवीन 75 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 40 प्रकरणे मुंबईत, नऊ ठाणे शहरातील, आठ पुणे शहरातील, पनवेलमधील पाच,
कोल्हापूर आणि नागपूरमधील प्रत्येकी तीन, पिंपरी-चिंचवडमधील दोन आणि भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, सातारा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम