माहीत आहे? भारताच्या नाकाशात श्रीलंका का दाखवला जातो

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- भारता शेजारी  पाकिस्तान,अफगाणिस्तान,म्यानमार,चीन,नेपाळ,भूतान इत्यादी देश आहेत परंतु नकाशात भारताच्या अधिकृत नकाशाबरोबर नेहमी श्रीलंका हा देश का दाखवला जातो.

असा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडला असेलच ना. श्रीलंकेवर भारताचा कोणताहीअधिकार नाही, किंवा दोन्ही देशांदरम्यान कोणताही करार नाही.

भारताच्या अधिकृत नकाश्यात श्रीलंकेच स्थान असण्यामागे एक गमतीदार कारण आहे. त्याच खरं कारण आहे ऑसियन लॉ. ऑसियन लॉ हा कायदा संयु्क्त राष्ट्रांनी तयार केलेला आहे. १९५६ मध्ये हा कायदा तयार करण्यासाठी युनायटेड नेशन्स कन्वेशन ऑन द लॉ ऑफ द सी नावाच्या एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

१९५८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याचा निकाल जाहीर केला होता. या संमेलनामध्ये समुद्राशी संबंधित सीमांबाबत एकमत करण्यात आले. सन १९८२ पर्यंत याची तीन संमेलने आयोजित केली गेली होती.

त्यामधून समुद्राशी संबंधित कायद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली. या कायद्यात निश्चित करण्यात आल्यानुसार भारताच्या नकाशामध्ये कुठल्याही देशाच्या बेसलाईनपासून २०० नॉटिकल मैलदरम्यान येणारी जमीन दाखवणे अनिवार्य आहे.

म्हणजेच कुठलाही देश समुद्राच्या किनाऱ्यावर असेल तर अशा स्थितीत त्या देशाच्या नकाशामध्ये त्याच्या सीमेपासून २०० नॉटिकल मैलदरम्यान ३७० किलोमीटर अंतर्गत येणारे क्षेत्र दाखवणे आवश्यक आहे.

भारताचे दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या धनुषकोडी येथून श्रीलंकेचं अंतर केवळ १८ नॉटिकल मैल एवढं म्हणजे ३३ किलोमीटर आहे. या कारणामुळे भारताच्या अधिकृत नकाशात श्रीलंकेचे स्थान आवश्यकच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe