अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक महत्वाचे आदेश दिले आहे.
जिल्ह्यातील संगमनेर ,अकोले व पारनेर या तीनही तालुक्यांत आगामी दहा दिवसांत 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे. याबाबत मी अधिकार्यांना पुन्हा सांगणार नाही.
ही शेवटची संधी देतो, करो या मरो याप्रमाणे काम करा नाहीतर कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज या तीनही तालुक्यांतील अधिकार्यांना दिला.
जिल्हाधिकार्यांनी संगमनेर येथे संगमनेर, अकोले व पारनेर या तीन तालुक्यांतील अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्यांनी अधिकार्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, करोनाच्या तिसर्या लाटेचा धोका वाढलेला आहे. लसीकरणा अभावी एकही मृत्यू झाला नाही पाहिजे याची सर्व अधिकार्यांनी दक्षता घ्यावी.
लसीकरणाबाबत काही जणांचा गैरसमज आहे. लसीकरणामुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही याबाबत जनजागृती करावी. लसीकरणामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्यास जिल्हाधिकारी जबाबदार राहील असेच नागरिकांना सांगा.
ग्रामीण भागात जनजागृती करा, गर्दीचे ठिकाण शोधून याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार्यांना सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम