अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर. पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून ओळखले जाणारे अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड अभयारण्य सगळ्यांना माहीत आहे.
पण अलीकडे चर्चेत असणारे हरिश्चंद्रगड अभयारण्य ते वाघदरी इथं वन विभागानं एक हायटेक चेक पोस्ट उभारली आहे. ही चेकपोस्ट पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाघदरी येथे वन विभागाने अशीच एक हायटेक चेक पोस्ट उभारली आहे.
या अभयारण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना सुविधा उपल्बध करून देण्यासाठी तसेच जेथे वीज आणि इंटरनेट पोहोचलेले नाही, तेथे अशा सुविधा देणे आव्हानात्मक ठरण्यासाठी ही यंत्रणा उभारली आहे. तसेच बीएसएनएलकडून फायबरद्वारे इंटरनेट आणि सौरऊर्जा यांचा वापर करून सीसीटीव्ही कॅमेरे आणि अन्य सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत.
या हायटेक चेकपोस्ट च्या उपाययोजना नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षकप अनिल अंजनकर व कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी या केल्या आहेत. सह्यादीचा मुकुटमणी म्हणून ओळखले जाणारे हरिश्चंद्रगड आणि आकर्षन असलेलं हरिश्चंद्रगड अभयारण्य, उंचच उंच डोंगररांगा, कात्राबाईची खिंड, घन चक्कर, शिरपुंजेचा भैरवगड अशा ठिकाणी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू असतो.
त्यामुळे गैरप्रकारावर नियंत्रण ठेवणे, पर्टकांची सुरक्षा, त्यांना काही सुविधा देणे अशा गोष्टी आवश्यक बनतात व अन्य ठिकाणी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे.
मात्र ह्या सगळया गोष्टी जंगलात कसे वापरायचे याचा प्रश्न पडलेला असताना तिथं पर्यटकांना मोबाईल ची सेवा मिळावी, इंटरनेट मिळावे त्यासाठी यावर मात करीत हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाने अत्याधुनिक तपासणी नाका उभारला आहे.
तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सौर उर्जेवरील दिवे बसविण्यात आले असून पर्यटकांकडून शुल्क वसुलीसाठी कॅशलेस सुविधा सुद्धा देण्यात आली आहे.
वनक्षेत्रपाल पडवळे यांच्या नियंत्रणाखाली वनपाल शंकर लांडे, वनरक्षक जी. बी. पालवी, गोविंदा आढळ, भोराबाई खाडे, अविनाश भोये, नीलेश पिचड, प्रदीप गोडे यासाठी कार्यरत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम