अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शिरूर तालुक्यात एका विधवा महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 8 जणांनी बलात्कार (Gang Rape in Shirur) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून या महिलेवर आठ नराधमांनी वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी बलात्कार केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी माऊली पवार , रज्जाक पठाण, काळु वाकुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पु गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज, नवनाथ वाळुंज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 32 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी या महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे त्या एकट्याच राहत होत्या.
याचा गैरफायदा या आरोपींनी घेतला. गेल्या वर्षात एप्रिल ते मे या काळात या महिलेवर गावात असलेल्या आठ जणांनी बलात्कार केला. पीडित महिलेला नदीकिनारी, घरात, शेतात तसेच इतर ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.
सततच्या त्रासाला कंटाळून या पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली. शिरूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम