मोठी बातमी ! ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ते ७८ वर्षांचे होते. आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. अनिल अवचट यांनी मराठी साहित्यामध्ये त्यांची पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचं योगदान दिलं.

त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. डॉ. अवचट यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.

डॉ. अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर गावातील आहे. मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून अनिल अवचट यांची ख्याती होती. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं होतं.

अनिल अवचट यांनी दलित, मजूर, भटक्या जमाती वेश्यायांच्या प्रश्नांविषयी लेख लिहिले होते. डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला.

त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe