नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर झाला ‘हा’ निर्णय

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच कोर्टाने त्‍यांना शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे.

त्यामुळे येत्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयात नितेश राणे यांनी हजर रहावे लागणार आहे.

नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला.

नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने २७ तारखेपर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते.

आता नितेश यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्‍याने त्‍यांच्‍या अडणीत वाढ झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe