मोठी बातमी! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झालं रद्द

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   सर्वोच्च न्यायालयाने आज भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांना दिलासा मिळाला असून राज्य सरकारला धक्का बसला आहे.

…म्हणून आमदारांचे निलंबन करण्यात आले होते इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता.

अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.

यानंतर याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत सांगत निलंबन रद्द केलं हे आहेत ते 12 आमदार अतुल भातखळकर,

राम सातपुते, आशिष शेलार, संजय कुटे, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया, गिरीश महाजन, जयकुमार रावल, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, नारायण कुचे, हरीश पिंपळे या आमदारांचा समावेश होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News