अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- मुंबईतील करोनास्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून चिंता करू नये, असा दावा मुंबई पालिकेने गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या, वैद्यकीय सुविधांचा तपशील सादर करून केला होता.
त्याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला राज्यातील करोनास्थिती स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. याच अनुषंगाने मुंबईसह राज्यातील करोना स्थिती शंभर टक्के नियंत्रणात असून ओमायक्रॉनमुळे भविष्यात निर्माण होणारी कोणतीही स्थिती
हाताळण्यासाठी सरकारी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने नुकताच उच्च न्यायालयात केला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. परंतु आता रुग्णसंख्येचा आलेख खाली येत असून दररोज दोन हजारांहून कमी नवे रुग्ण आढळत आहेत.
तसेच रुग्णांलयावर ताण नसून पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचा दावाही पालिकेतर्फे करण्यात आला. तर राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम