एसटीची चाके सुसाट…’या’ जिल्ह्यात धावतायत दिवसभरात २०० बसेस

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटला नाही मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात आता हळूहळू एसटीचे चाक फिरताना पाहायला मिळत आहे.

संपाच्या सुरुवातील एकही लाल परी न दिसणाऱ्या औरंगाबादच्या रस्त्यावर आता दिवसभरात २०० बसेस धावताना पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील एसटी संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही आहे.

मात्र यातूनच एक दिलासादायक माहिती मराठवाड्यातून समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या ५३६ पैकी २०० बसेस रस्त्यावर धावत आहेत. संपात असलेले अनेक कर्मचारी कामावर हजर झाले आहे.

तसेच एसटी महामंडळाकडून निवृत्त एसटी चालकांना सुद्धा कंत्राट पद्धतीवर कामावर घेण्यात आला आहे. त्यामुळे आगारात उभ्या असलेली लालपरी आता रस्त्यांवर सुसाट धावत असून नागरिकांना प्रवासाची सुरळीत सेवा देण्यासाठी एसटी यशस्वी होताना पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात एकूण धावत असलेल्या २०० बसेसच्या ५१२ फेऱ्या दिवसभरात होत आहेत. तसेच भविष्यात बसेसची आणि फेऱ्याची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.

संपावर असलेल्या कर्मचारी यांच गेल्या तीन महिन्यापासून पगार नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. तर काही जण आता कामावर हजर राहण्याच्या मनस्थितीत आहे तर काहींनी संपावर कायम रहाण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe