मोठी बातमी ! नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबतची आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.

न्यायालयाने त्यांना येत्या ४ फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली गेली होती.

आज दुपारी आमदार नितेश राणे यांनी शरणागती पत्करल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आमदार नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयात दाखल झाल्यानंतर चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले होते.

राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यामुळे मोठा धक्का मानला जात आहे. भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत.

नेमके प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब याच्यावर कणकवली करंजे येथील घरी जाताना दि.१८ डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीला मागवून इनोवा गाडीने धडक दिली होती.

गाडीला धडक दिल्यानंतर दुचाकी त्यांच्या पायावर पडली आणि गाडीतील संशयितांनी येऊन त्यांच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला अशी त्याने तक्रार दिली होती.

त्यानंतर चौघांना फोंडाघाट तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते तर सचिन सातपुते याला दिल्लीवरून अटक झाली होती

आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख तपासात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe