अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- राज्य पोलीस दलातील ४५३ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना मूळ सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस निरीक्षकपदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
दरम्यान यामध्ये नवी मुंबई पोलीस दलातील १९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांची निशस्त्र पोलीस निरीक्षकपदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीवर पदस्थापना करण्यात आली आहे.
ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तसेच, आचारसंहिता लागू आहे, त्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी निवडणूक आयोगाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीवकुमार सिंघल यांनी बुधवारी दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षकपदावरून पोलीस निरीक्षकपदावर बढती मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांविरुद्ध खातेनिहाय चौकशी, गुन्हा, निलंबनाची कारवाई झाली आहे, त्यांच्याबाबत संबंधित घटक प्रमुख यांनी पोलीस महासंचालक कार्यालयास कळवावे, असे आदेशात म्हटले आहे.
बढती मिळालेल्या पोलिसांची नावे (नवी मुंबई पोलीस दलातील) मानसिंग बाळासाहेब डुबल, नीलेश बबन तांबे, राम महादेव मांगले, दादासाहेब दत्तात्रय एडके,
प्रवीण पांडुरंग पांडे, नितीन शांताराम राठोड, दीपक वसंत शिखरे, दीपक तुकाराम महाडिक, मंगेश भीमराव बोरसे, सचिन पांडुरंग राणे, सचिन पांडुरंग खोद्रे,
विजय नामदेव खेडकर, राजेश विजय गज्जल, राजू संपत सुर्वे, संतोष काशिनाथ पवार, मनोजसिंग चौहान, सोपान नांगरे, ज्ञानेश्वर मुकुंदराव भदोडकर, नितीन पगार यांचा समावेश आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम