अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- निवडणूका डोळ्यासमोर न ठेवता विखे पाटील परिवार रात्रदिंवस मतदार संघातील नागरीकांचे प्रश्न सोडवित आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीचे काम शिर्डी मतदारसंघात अखंडपणे सुरू आहे.
बांधकाम कामगारासांठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविताना मिळणारे समाधान अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोणी येथील जनसेवा संपर्क कार्यालयात जनसेवा फौंडेशन व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी विधानसभा मतदार संघातील ८९७ बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना अटल विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कार्डचे वितरण सौ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अनिल विखे, सरपंच सौ.कल्पना मैड, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच गणेश विखे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब धावणे, रामभाऊ विखे, ग्रामपचांयत सदस्या सौ.उज्वला बोरसे अशोक धावणे, दिपक विखे, प्रविण विखे, चांगदेव विखे यांच्यासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अहमदनगरचे प्रतिक देशमाने, प्रविण औटी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सौ.शालिनीताई विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाल्या की, शिर्डी विधानसभा मतदार संघात शासनाच्या सर्वच योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चाने योजनेतील १८०० लाभार्थ्यांची नोंदणी केली आहे.
यापैकी आज ८९७ लाभार्थ्यांना नोंदणी कार्डचे वितरण करण्यात आले. देशात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना संरक्षण कवच अटल विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून मिळाले आहे.
या योजनेतून कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून, जनसेवा फौडेंशनने या कामगारांना अटल विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळावा म्हणून स्वतंत्र कक्ष सुरु करुन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यानेच एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांची नोंदणी होवू शकल्याचे त्यांनी सांगितले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला, मुलांसाठी व आर्थिक कमकुवत असलेल्या महिलांना जनसेवा फौंडेशन आणि महिला बचत गटांच्या माध्यमातूनही शिलाई मशिन, पिठाची गिरणी देवून स्वत:चा व्यवसाय सुरु करुन त्यांना सक्षम करण्याचे काम जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून झाले आहे.
दुष्काळात खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सुरु केलेल्या जलक्रांती अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आडवल्याने मतदार संघात शेतीला मोठा फायदा झाला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिनेट सदस्य अनिल विखे पाटील यांनी केले तर आभार उपसरपंच गणेश विखे यांनी मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम