अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- देशात कोरोनाचे संकट कायम असताना यातच आणखी एका संकटाची भर पडली आहे. ती म्हणजे राज्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट घोंगावू लागले आहे.
दरम्यान राज्यात काही ठिकाणी याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. बर्ड फ्लू वाढू नये यासाठी काळजी घेण्यात येऊ लागली आहे. दरम्यान बर्ड फ्लूचा विषाणु नेमका तयार कसा होता. त्याचा संसर्ग कसा होता. त्यावर उपाय योजना काय करायला हव्या याबाबत अनेक मार्गदर्शन करायला देखील सुरूवात केली असल्याची माहिती मिळत आहे
नेमका हा रोग कसा पसरतो :- बर्ड फ्लू हा आजार H1N1 या व्हायरसमुळे तयार होतो, त्याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. बाहेरून आलेल्या कोंबड्या आणि बदकांमुळे तो इतर पक्षात सामील होतो.
टोळीतल्या एका पक्षाला त्याची बाधा झाल्यानंतर तिथं असलेल्या सगळ्या पक्षांना त्याची बाधा होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे तो माणसांना देखील होऊ शकतो. 1997 मध्ये बर्ड फ्लूचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं.
बर्ड फ्लूचं झाल्यानंतर काय करावं:- जिथं कोंबड्या तडफडून मरत असतील, तर त्यांची तिथल्या जिल्हा पशुसंवर्धन विभागात तक्रार दाखल करावी. त्यानंतर त्यांचे कर्मचारी तुमच्या मेलेल्या कोंबड्या तपासणीला पाठवतात.
तुमच्या पोल्ट्री परिसरात तुम्ही काम करीत असताना पीपीई कीट आणि ग्लोज वापरणे अनिवार्य आहे. कारण त्यामुळे तुमच्या शरिराला कोणत्याही प्रकारची इचा व्हायचे शक्यता अत्यंत कमी असते. बर्ड फ्लू हा आजार माणसांना देशील श्वसनाच्या वाटेद्वारे होऊ शकतो.