दोन जण दोन वर्षाकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  भिंगार कॅम्प पोलीसांनी दोन जणांवर दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपाराची कारवाई केली आहे.

यामध्ये फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा . कादरी मस्जिद जवळ , मुकुंदनगर ता. जि. अहमदनगर ), पप्पू उर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरी मळा, नगर सोलापुर रोड , अहमदनगर ) असे यांची नावे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याकडून फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख,

पप्पू उर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे यांचेविरूद्ध उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या आदेशाने या भिंगारच्या दोन्ही गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आल्याचा आदेश भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्याने

दोघा गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News