भाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  सध्या बाजारात भाजीपाला परत एकदा चांगला महाग होत चालला आहे. यात सर्वाधिक म्हणजे १७० रूपये प्रतिकिलो इतका उच्चांकी दर गवारीच्या शेंगाला मिळाला आहे.

त्यापाठोपाठ शेवगा, दोडका, कारले, शिमला मिरची व हिरव्या मिरचीने देखील चांगलाच भाव खाल्ला आहे. सततचा पाऊस आणि त्यात झालेली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी परत एकदा मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड केली. परंतु परत एकदा निर्सगाने शेतकऱ्यांवर डोळे वटारले.

नंतर सकाळी मोठ्या प्रमाणात धुके, रात्री प्रचंड थंडी त्यात दिवसभर सुर्य दर्शन न झाल्याने पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादर्भाव झाला परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारावी लागली.

मात्र तरीदेखील मोठ्या प्रमाणावर पिकास रेगाचा फटका बसल्याने उत्पन्नात चांगलीच घट आली असून शेतमालाची आवक मंदावली आहे. आवक कमी झाल्याने दर्जेदार मालास अधिक भाव आला असून, वांगे, गवार, फ्लॉवरसह भाजीपाल्याचा तोराही अधिक वाढला आहे.

यात यात चवळी, टोमॅटो, ढोबळी मिरची, दोडकेचे दर किलोमागे ८० रुपयांच्या घरात गेले आहेत.यात सर्वाधिक म्हणजे तब्बल १७० रूपये किलो इतका भाव गवारीच्या शेंगाला मिळत असून भेंडी देखील चांगलीच वधारली आहे.

सध्या ४० रुपये किलो या दराने भेंडीची विक्री होत आहे.दोडका व कारल्याचे दरही ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.