अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- नागापूर एमआयडीसीतील कंपनीवर दरोडा टाकणार्या मोक्का गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख आरोपी सीताराम ऊर्फ शीतल ऊर्फ गणेश भानुदास कुर्हाडे (वय 33 मूळ रा. चितळी ता. राहाता, हल्ली रा. वडगाव गुप्ता ता. नगर), पंकज बापू गायकवाड (रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर) यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. एमआयडीसीतील कंपनीवर दरोडा टाकणार्या टोळीचा सूत्रधार कुर्हाडे आणि पंकज गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्या विरोधात मोक्का कलमान्वये गुन्हा दाखल आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या आरोपींनी दरोडे, रस्ता लूट आणि चोर्या या सारखे अनेक गंभीर गुन्हे केलेले आहेत.
या गुन्ह्यातील पैशातून त्यांनी काही मालमत्ता खरेदी केली आहे का? या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी सध्या पसार आहे. त्याचा शोध घेणे, आणखी काही साथीदार आहेत का, आदी बाबींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.