अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- अलीकडे काम न करता पैसे कमावण्याची नवीन क्रेझ निर्माण होत आहे. मग पैसे मिळवण्याच्या नादात अनेकजण चुकीचा मार्ग निवडतात. असेच कुठेतरी दरोडा टाकण्यासाठी जात असलेली टोळी पोलिसांनी जेरबंद केली.
पोलिसांच्या कारवाई दरम्यान मात्रअंधाराचा फायदा घेत चौघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले तर ताब्यात घेतलेल्यांकडून दोन मोटारसायकलसह सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यात दरोडा टाकण्याचे उद्देशाने नगर सोलापूर रस्त्यावरील बनपिंप्री परिसरातील एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काहीजण थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता सहाजण दबा धरून बसलेले दिसले.
पोलिसांची चाहूल लागताच काहीजण पळून गेले. गहिनीनाथ उर्फ गहिण्या ईश्वऱ्या भोसले, लाल्या उर्फ ,रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अ.नगर या दोघांना ताब्यात घेतले.
पकडलेल्या या दोघांकडे अधिक माहिती विचारली असता त्यांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपून बसल्याची कबुली देत त्यांच्याकडून विना नंबरची होंडा शाईन,
होंडा युनिकॉर्न अशा दोन दुचाकीसह दरोडा टाकण्यासाठी कटावणी, नॉयलॉन दोरी, मिरचीपुड, धारदार सुरा या सारखा मुद्देमाल ताब्यात घेतला. फरार झालेले संदिप ईश्वऱ्या भोसले,
अतुल उर्फ अटल ईश्वऱ्या भोसले,(रा. बेलगाव, ता. कर्जत, जि.अ.नगर), शामुल नवनाथ काळे,(रा. वाकी, ता. आष्टी, जि.बीड), कानिफनाथ कल्याण भोसले पारोडी, (ता. आष्टी, जि.बीड) असे पळून गेलेल्या चार आरोपींची नावे आहेत.