मोठी बातमी! आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचं अखेरीस उघड

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   गेले महिनाभर गाजलेले क्रूस ड्रग्स प्रकरणात एक अत्यंत महत्वाचमाहिती समोर आली आहे.

कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असं एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंती उघड झालं आहे.

आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही असं या समितीनं म्हटलं आहे. यामुळे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तसेच मोठे आरोप – प्रत्यारोप यावेळी करण्यात आले होते.

नेमके काय म्हंटले आहे एनसीबीने _ अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. हे ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर एनसीबीचा दावा असा होता की आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे.

मात्र आता एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर हे उघड झालं आहे की आर्यन खानकडे कोणतंही ड्रग नव्हतं आणि त्याचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नव्हता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe