देशातील ‘या’ 2 शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्रीवर बंदी; समोर आले मोठे कारण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तीर्थ स्थळ कुंडलपूरसह 2 शहरांना पवित्र क्षेत्र म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

दोन शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्रीवर बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्री होणार नाही. या 2 शहरांना पवित्र शहरांचा दर्जा देण्यात आला आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथे 285 किमी दूर दमोह जिल्ह्यातील कुंडलपूर इथे जैन समुदायाच्या पंचकल्याणक महोत्सवात याची घोषणा केली.

कुंडलपूर आणि बांदकपूर या दोन्ही शहरांना पवित्र शहरांचा दर्जाही त्यांनी यावेळी दिला. या दोन्ही शहरांमध्ये मद्यविक्रीवर बंदी लावण्यात आली आहे. बांदकपूर शहर भगवान शंकराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News