“दोष EVMचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा”; असदद्दुीन ओवेसींची निवडणूक निकालावर प्रतिक्रिया

Published on -

हैदराबाद : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये ५ पैकी ४ विधानसभेवर भाजपने (BJP) कब्जा केला आहे. तर एक ठिकाणी आप (AAP) ने विधानसभा काबीज केली आहे. या निवडणूक निकालावरूनच (Election Result) असदद्दुीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एमआयएम पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एकही जागा मिळाली नाही. यावेळी ओवेसी यांनी मतदारांनी दिलेला कौल स्वीकारत असल्याचेही म्हंटले आहे. तसेच त्यांनी आमची कामगिरी अपेक्षित झाली नसल्याचे म्हंटले आहे.

निवडणूक निकालानंतर अनेकांनी EVM वर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर ओवेसी यांना प्रश्न विचारण्यात आला आता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लोकांबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ओवेसी म्हणाले, दोष ईव्हीएमचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा असल्याचं ते म्हणाले. काही राजकीय पक्ष त्यांचं अपयश लपवण्यासाठी ईव्हीएम ईव्हीएमचा गजर आहेत.

मात्र, मी 2019 मध्येही सांगितलं होतं की चूक ईव्हीएमची नाही लोकांच्या डोक्यात टाकण्यात आलेल्या चिपचा हा परिणाम आहे.

हे भाजपला यश मिळालंय पण ते 80-20 चं यश आहे. आम्ही चांगलं काम केलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना काम करत राहा

मी लोकांच्या निर्णयाचं स्वागत करतो. एमआयएमचा पक्ष प्रमुख म्हणून उत्तर प्रदेशातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार मानतो.

ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यांचा ऋणी आहे. आम्हाला आता यश आलं नसलं तरी आम्ही पुन्हा मेहनत करु असेही ओवेसी म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News