अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :-काही दिवसांपूर्वी हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी ऑडिओ क्लिप बद्दल कंपनी संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे एक तक्रार अर्ज दिला होता.
तो तक्रार अर्ज पोलिसांनी निकाली काढला आहे. यामध्ये संबंधित कंपनीची कोणतीही चूक नाही, असे तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
माझ्या कीर्तनाच्या बनावट सीडी प्रसारित करण्याचा प्रकार सध्या घडत असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी इंदुरीकर महाराज यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली होती.
याविषयी अधीक्षक पाटील म्हणाले, इंदुरीकर महाराज यांनी दिलेल्या अर्जाबाबत माहिती घेऊन संबंधित कंपनीकडे तपासणी केली.
संबंधित कंपनीने त्यांच्याकडील कागदपत्रांनुसार रीतसर परवानगी घेतलेली असल्याने कंपनीची कोणतीही चूक नाही, असे तपासामध्ये निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.