सोलापर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांचे प्रकरण काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आले होते. त्यानंतर करुणा शर्मा या प्रकाश झोतात आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.
करुणा शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North By Election) मैदानात उतरणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
करुणा शर्मा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा पंढरपूरमधून केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.
त्या म्हणाल्या, राजकारण कसं चालतं हे मी गेली 25 वर्षापासून पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट (Movie) काढला तर हो सुपर डुपर चालेल. असे वक्तव्य केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आता करुणा शर्मा सरसावल्या असल्याचे दिसत आहे.
करून शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पक्षाची घोषणा केली आहे. शिवशक्ती सेना (Shivshakti Sena) असे त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव ठेवले आहे. यावेळी त्यांनी नेक पक्षांनी मला प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं होतं,
मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत असा दावाही केला होता.