मुंबई : ‘RRR’ हा चित्रपट (Film) रिलीज होण्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट रिलीज होऊन पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) जोरदार कमाई केली आहे.
ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) स्टारर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘RRR’ हा ४०० कोटींचा चित्रपट आहे. या चित्रपटाने देशाबाहेरही जोरदार कमाई केली आहे.
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात १८ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर RRR अमेरिकेतही चांगला व्यवसाय करत आहे. तसेच ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंडमध्येही (New Zealand) या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी १८ कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, तेलगू राज्यांमध्ये, चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत, आणि १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
देशभरातील ८ हजाराहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या ‘RRR’ (RRR साठी चाहते वेडे होतात) या चित्रपटाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावरही ‘आरआरआर’ ट्रेंडिंग सुरू झाला आहे. आदल्या दिवशी, सिनेमा हॉलमधील एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांना थिएटरमध्ये पाहिल्यानंतर लोकांनी नोट्स आणि पेपर्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली.