मुंबई : लाफ्टर क्वीन (Laughter Queen) भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) नुकतेच आई-वडील झाले आहेत. कारण त्यांचा घरात आता एका छोट्या बाळाचे आगमन झाले आहे.
याबाबत भारतीने तिच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरून (account) चाहत्यांना ही आनंदाची बातमी (Good News) दिली असून, ‘इट्स अ बॉय’ असे लिहिले आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना ‘मुलगा’ झाला आहे.

हे दोघेही टीव्ही इंडस्ट्रीतील (TV industry) लोकप्रिय जोडपे आहेत. आजकाल दोघेही कलर्सवरील ‘द खतरा खतरा’ शो होस्ट करताना दिसत आहेत. भारती सिंग तिच्या संपूर्ण गरोदरपणाच्या प्रवासात शूटिंग सेटवर काम करताना दिसली होती, जिथे काही वेळा ती पापाराझींसोबत विनोद करतानाही दिसली होती.
कॉमेडियनने एका मुलाखतीत तिच्या गरोदरपणाबद्दल खुलासा केला होता की, तिला तिच्या अडीच महिन्यांच्या गर्भधारणेबद्दल माहिती नव्हती. भारतीने सांगितले की, जेव्हा मी गरोदर राहिली तेव्हा अडीच महिने मला माहित नव्हते की मी गरोदर आहे.
भारती-हर्ष यांनी त्यांचे यूट्यूब चॅनल ‘LOL-Life Of Limbachiyaas’ सुरू केले आहे. ज्यावर या जोडप्याने अलीकडेच मुलाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये या जोडप्याला प्रश्न विचारण्यात आला की, हे मूल भारती सिंगसारखा विनोदी कलाकार होणार की वडील हर्षसारखा लेखक?
यावर भारती उत्तर देते, ‘मुल कॉमेडियन होईल, कारण लेखकांना पगार मिळत नाही आणि कॉमेडियन… उफ्फ, उफ्फ, उफ्.’ त्याचवेळी भारतीने तिच्या गरोदरपणाबद्दल माहिती देताना स्पष्ट केले होते की, तिला नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे, त्यामुळेच ती रात्रंदिवस काम करत आहे.
प्रसूतीपूर्वी भारतीचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता, जेव्हा तिने सेटवर शूटिंगमधून ब्रेक घेतला आणि दुपारच्या जेवणासाठी बाहेर गेली आणि पापाराझींशी गप्पा मारताना दिसली.