Sanjay Dutt : बॉलीवूडमध्ये (Bollywood) मुन्ना भाई म्हणून ओळखला जाणारा अभिनेता संजय दत्त नुकताच कॅन्सरच्या (Cancer) आजारातून जात आहे, या आजाराबाबत व शुटिंगबद्दल संजय दत्त याने एक काळजाला भिडणारा अनुभव सांगितला आहे.
संजय दत्त लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या (South Film Industry) ‘KGF Chapter 2’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्तला ‘अधीरा’च्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.

या चित्रपटाद्वारे संजय दत्त कन्नड सुपरस्टार यशसोबत बॉक्स ऑफिसवर (Box Office) थैमान घालणार आहे. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट १४ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी संजय दत्तने चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित आपले अनुभव सांगितले आहेत. फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंज देत असताना मी चित्रपटाच्या कठीण क्लायमॅक्सचे (Climax) शूटिंग करत होतो. कॅन्सरवर उपचार घेत असताना त्याने ‘कठीण-क्लायमॅक्स’ सीन कसा शूट केला ते सांगितले आहे.
२०२० मध्ये जेव्हा जगाला कोरोना महामारीचा सामना करावा लागत होता, त्याच काळात संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे समोर आले. यानंतर अभिनेत्यासाठी आव्हाने वाढली पण त्याने हार मानली नाही. सखोल उपचारादरम्यान संजय दत्त ‘केजीएफ-2’चे शूटिंग करत राहिला.
संजय दत्तने मिड-डे पासून ‘KGF-2’ साठी शूटिंग करतानाचे अनुभव शेअर करताना “त्याने मला आरामदायी बनवण्यासाठी सर्व काही केले.” असे सांगत KGF Chapter 2 चे दिग्दर्शक प्रशांत नील आणि टीम त्याच्या आयुष्यातील कठीण काळातील मैत्रीबद्दल व्यक्त झाला आहे.