ते नक्की एसटी कर्मचारीच होते का? या नेत्याने व्यक्त केली शंका

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 maharashtra news :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनाविषयी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र यासंबंधी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘पवारांच्या घरासमोर आंदोलन करणारे आंदोलक खरे एसटी कर्मचारी होते का?’ अशी शंका पाटील यांनी उपस्थित केली आहे.

जामखेड येथे राष्ट्रवादी संवाद कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. पाटील म्हणाले, ‘गेली कित्येक वर्ष पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मदत केली आहे.

अश परिस्थितीत खरा एसटी कर्मचारी कधीही त्यांच्या घरावर अशा पद्धतीने चाल करून जाणार नाही. हे जाणीवपूर्वक केलेले काम आहे.

जे तेथे आले ते एसटी कर्मचारी होते का? ते कोणत्या परिस्थितीत होते, हे सत्य लवकरच बाहेर येईल,’ असेही पाटील म्हणाले.

उदयनराजे संध्याकाळी बोलले आहेत : पाटील या आंदोलनावर साताऱ्याचे उदयनराजे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘जे केलं ते इथच फेडावं लागेल’ असे उदयनराजे म्हणाले आहेत. यासंबंधी विचारले असता मंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘उदयनराजे संध्याकाळी बोलले आहेत. ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत? हे तपासले पाहिजे. नंतरच त्यावर मी बोलेन.’

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News