Mahavitaran News : रात्रीच्या भारनियमामुळे विद्यार्थ्यांचे व शेतकऱ्यांचे होतायत हाल; भारनियमाविरूध्द …

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या महावितरणा कडून आंबेगाव तालुक्यात रात्रीच्यावेळी ३ ते ४ तास भारनियमन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे.

तर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही गंभीर झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या भारनियमन विरूध्द शेतकरी व नागरीक चांगलेच आक्रमक झाले आसून त्याविरोधात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्यासह वीज बिल न भरण्याचा इशारा महावितरणला दिला आहे.

आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरातील टाव्हरेवाडी या फिडरद्वारे गुरुवार रात्रीपासून हे भारनियमन सुरु करण्यात आले आहे.

तर भारनियमन रद्द करण्यासाठी परिसरातील तीन गावांच्या ग्रामस्थांनी महावितरणला निवेदन दिले आहे. तसेच याबाबतचे निवेदन राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठविण्यात आले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

तर गावाच्या ग्रामस्थांकडून नियमित बिल भरणा करून देखील भारनियमन होऊ लागल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

तर या परिसरातील शेतकऱ्यांना रात्री देण्यात आलेल्या भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी शेतात कामानिमित्त ये-जा करावी लागत आहे.

आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आसल्या मुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. आणि या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. तर रात्रीच्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News