राज ठाकरेंनी धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू नये, याचा राजकीय फायदा त्यांना होणार नाही; रामदास आठवले

Published on -

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणामध्ये मशिदींवरील भोंगे हटविण्यावर आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या या भूमिकीमुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.

याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध असून धर्माचा अपमान करू नये असा सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.

आठवले म्हणाले, एका धर्माने (Religion) दुसऱ्या धर्माचा अपमान करू नये, राज ठाकरे यांनी उलट सुलट बोलणे बंद केले पाहिजे. सुरक्षेबाबत केंद्र सरकार (Central Government) निर्णय घेईल, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

तसेच राज ठाकरेंनी त्यांची भूमिका बदलेली आहे. त्यांच्या झेंड्यामध्ये विविध रंग होते. पण त्यांनी आता एकदम कठोर भूमिका घेतली आहे. या कठोर भूमिकेमुळे त्यांना काही राजकीय फायदा होणार नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

त्याचसोबत राज ठाकरे यांनी धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू नये. हवे असल्यास ते मंदिरात भोंगे लावू शकतात पण मशिदींमधून ते हटवण्याची मागणी करू नये, असे आठवले म्हणाले आहेत.

तर आपल्या देशात लोकशाही आहे. भारतातील मुस्लीम पूर्वी हिंदू होते. त्यामुळे एक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा. प्रत्येक पक्षाची मुस्लीम विंग आहे, त्यामुळे भोंगे काढायला लावणे योग्य नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News