“अमोल कोल्हेंची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले …तर ते योग्य होणार नाही”

Published on -

औरंगाबाद : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जातीयवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीका केली आहे.

त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमोल कोल्हे माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हणाले, पवार साहेबांवर टीका करणे हे हास्यास्पद आहे. गेल्या 55 वर्षापासून महाराष्ट्राच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या पवार साहेबांवर जेव्हा आरोप होतो, तेव्हा आपल्या वाटलं तथ्य पडताळून पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पवार साहेबांच्या काळामध्ये स्थानिक स्वराज संस्थान मध्ये 55 टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. महिला घोरण राबवणारे महाराष्ट्र पाहिलं राज्य आहे. महिला धोरणला तुम्ही जातीवादी रंग देणार, तर ते योग्य होणार नाही असेही कोल्हे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, तर इतिहासाचा वापर हा देशहितासाठी व्हावा, द्वेशासाठी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठला नाव देणाऱ्या पवारसाहेबांना तुम्ही जातीयवादी म्हणता,

तेच त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्रवान वाचावे, ज्यामध्ये जातीचा उल्लेख आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. कुठे तरी चुकीचं नेरेटिव्ह सेट करणं हा प्रयत्न आहे,

मला वाटतं पवार साहेबांवर आरोप करत असताना एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जेव्हा उद्योग स्नेही धोरण सुरू केलं, महाराष्ट्रात पहिली एमआयडीसी झाली.

या नोकऱ्या देताना कोणी जाती धर्माचा विचार केला नाही, असेही त्यांनी सांगितले. पवार साहेब कृषिमंत्री असताना देश पहिल्यांदा अन्नपूर्ण झाला असेही अमोल कोल्हे बोलताना म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीविषयी बोलताना ते म्हणाले, कुठे तरी त्यांच्या फिडमध्ये गडबड झालेली असू सकते, कारण सोशल मीडियावर कालपासून बघत असल अनेक समाज संशोधकाने पुरावे दिले आहेत.

रायगडावर महाराजांच्या समाधी 1869 साली ही महात्माफुले यांनी पहिल्यांदा शोधली, शिवजयंती महात्मा फुले आदींनी सुरू केली, पुण्यामध्ये पहिला छत्रपती शिवाजी महाराज्यांचा पुळळा उभा करण्यात आला.

ब्रिटिश सरकारने समाधी बाधण्यासाठी पुढाकार घेतला होता. महाराजांच्या समाधीबद्दल फीड चुकीचं देण्यात आलं, असेही कोल्हे म्हणाले आहेत. तसेच मला यावर भाष्य करण्याचं गरज नाही.

हा जो इतिहास आहे. इतिहास तरखांच्या आधारे बोलायचा असतो अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी माध्यमांना दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!