औरंगाबादमधील भाषणासंबंधी राज ठाकरेंवर आजच होणार कारवाई, पोलिस महासंचालकांचे संकेत

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणावरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

राज ठाकरेंच्या भाषणावर कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत, अशा शब्दांत पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

जी काही कारवाई व्हायची, ती आजच होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी राज्यभरातील पोलिसांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठाकरे यांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या तयारीची माहिती देण्यासाठे महासंचालक सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कायदा-सुव्यवस्था बिघवडणाऱ्यांवर, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे.

मनसेच्या १५ हजार जणांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांंच्या सुट्ट्या रद्द, राज्यात होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या तैनात, राज्यभरात ३० हजार होमगार्ड तैनात

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe