अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : सभेला परवानगी देताना घालून दिलेल्या अटींचे पालन न केल्याचा ठपठा ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
औरंगाबादच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. औरंगाबादेतील सिटी चौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

file photo
दुपारी एक वाजता पोलिस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईचे संकेत दिले आणि दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद पोलिसांनी ठाकरे यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली.
सभेत पोलिसांनी त्यांना १६ अटी शर्थीचे पालन करण्यासाठी बजावले होते. त्यातल्या १२ अटींचे उल्लंघन केल्याने राज ठाकरेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करण्याचे कलम त्यांच्याविरोधात लावण्यात आले आहे