Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy

शरद पवारांबाबत अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह Facebook पोस्ट, गुन्हा दाखल

Saturday, May 14, 2022, 9:35 AM by Ahilyanagarlive24 Office

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ने राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विषयी वादग्रस्त फेसबूक पोस्ट (Facebook Post) केल्यामुळे या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये (police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळेनी तिच्या फेसबुक अकाऊंटवरून (Facebook account) शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टमुळे अनेकांनी संताप व्यक्त करत केतकीला चांगलच सुनावलं आहे. तसेच शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये १५३ ओ आणि ५०५ अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कळवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे मी स्वत: व माझे सारखे इतर कार्यकर्ते उद्वीग्न झालेलो आहोत. तसेच केतकी चितळे हिने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केलं आहे.

सदर महिलेने आणखी देखील पोस्ट केल्या असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांना उद्देशून बदनामीकारक आणि द्वेषकारक पोस्ट करणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे, असे सांगितले आहे.

Categories ताज्या बातम्या, महाराष्ट्र Tags Facebook Account, Facebook Post, Ketaki Chitale, NCP, Sharad Pawar
ये हुई ना बात! उच्चशिक्षित असूनही शेतीला प्राधान्य; आज करतोय लाखोंची कमाई
Gold Price Today : सोने-चांदीचे दिलासादायक दर जाहीर, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची ताजी किंमत
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress